Siya Goyal Video | पुणे (Pune) येथील केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणानंतर आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिच्याबाबत विविध माहिती आणि दावे समोर येत आहेत. या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सियाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, केतनच्या कुटुंबीयांनीही काही गंभीर आरोप केले आहेत.
व्हायरल व्हिडीओमुळे रंगल्या चर्चा :
समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 19 जून 2024 रोजी झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्हिडीओमध्ये सिया एका पबमध्ये मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. कार्यक्रमस्थळी मोठ्या आवाजातील संगीत, रोषणाई आणि पार्टीचे वातावरण दिसून येत असल्याचेही व्हिडीओत आढळते.
सियाच्या बर्थडे पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणातील आरोपी सियाचा तिचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A video of Siya an accused in the Ketan Agrawal murder case celebrating her birthday is currently going viral on… pic.twitter.com/3IeN61fmBl
— थोडक्यात (@thodkyaat) June 24, 2026
तसेच व्हिडीओमध्ये ती मित्रांसोबत नृत्य करताना आणि वाढदिवसाचा केक कापताना दिसत असल्याची चर्चा आहे. या दृश्यांमुळे तिच्या जीवनशैलीबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, व्हिडीओच्या आधारे केल्या जाणाऱ्या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Siya Goyal Video | केतनच्या कुटुंबीयांचे आरोप :
या व्हिडीओनंतर केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनीही आपली भूमिका मांडली आहे. केतनच्या आईने सियाच्या कुटुंबीयांवर काही माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. लग्नाची बोलणी सुरू असताना सियाबाबत ज्या प्रकारची प्रतिमा त्यांच्यासमोर मांडण्यात आली होती, ती आणि आता समोर येत असलेली माहिती यामध्ये मोठा फरक असल्याचा दावा त्यांनी केला.
केतनच्या आईच्या म्हणण्यानुसार, सियाच्या वैयक्तिक जीवनशैलीशी संबंधित काही बाबी त्यांच्यापासून दडवून ठेवल्या गेल्या होत्या. सोशल मीडियावर समोर आलेले व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक गोष्टींची नव्याने जाणीव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत सिया किंवा तिच्या कुटुंबीयांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. केतन हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित विविध पैलूंवरही चर्चा सुरू आहे.






