“केतन जिवंत आहे…” ते शब्द ऐकताच सियाला घाम फुटला; पुढे घडलं भयंकर

On: June 24, 2026 8:21 PM
Ketan Agarwal Case
---Advertisement---

Siya Goyal | पुण्यातील(Pune) केतन अग्रवाल(Ketan Agarwal) हत्या प्रकरणात दररोज नवे तपशील समोर येत असून तपासाला वेगवेगळे पैलू मिळत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल(Siya Goyal) हिच्या वर्तनाबाबत आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी तिची प्रतिक्रिया आणि पोलिसांसोबतचे संभाषण यामुळे या प्रकरणाबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

“त्यावेळी सिया घाबरलेली दिसत होती” :

लोहगड किल्ल्यावर(Lohagad Fort) घडलेल्या घटनेनंतर तेथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गडावरून एक व्यक्ती दरीत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सिया घाबरलेली दिसत होती, मात्र तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते. ती मोठ्याने मदतीसाठी ओरडत होती, अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानंतर तिने सर्वप्रथम केतन खाली पडल्याची माहिती कुटुंबीयांना दिली, तर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तातडीने रुग्णवाहिका बोलावली.

पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवून केतनचा शोध घेतला. सियाने दाखवलेल्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर केतनचा मृतदेह आढळल्याचे सांगितले जाते. मात्र त्या वेळी सियाला प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देण्यात आली नव्हती. तिला रस्त्याजवळ थांबवण्यात आले होते, तर पोलीस जंगलातून बाहेर येत होते. प्रत्येक वेळी ती केतनच्या प्रकृतीबाबत विचारणा करत होती, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितली धक्कादायक बाब :

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, सियाला मानसिक धक्का बसू नये म्हणून तिला वारंवार “केतन जिवंत आहे, तो सुरक्षित आहे, फक्त जखमी झाला आहे” असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र केतनचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे शब्द ऐकल्यानंतर सिया अधिकच अस्वस्थ झाली. तिच्या हालचालींमध्ये भीती आणि तणाव स्पष्टपणे जाणवत होता. ती सतत थरथरत असल्याचेही संबंधित कर्मचाऱ्यांनी निरीक्षण केले.

याच दरम्यान, तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र त्या वेळी पोलिसांचे लक्ष बचाव आणि शोधकार्यात असल्याने या बाबींकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. सियाच्या वर्तनाबाबतची ही माहिती आता चर्चेचा विषय ठरली आहे.

Siya Goyal | तिकीटाशिवाय गडावर प्रवेश केल्याचा दावा :

या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. लोहगडावरील तिकीट काउंटरवर कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया प्रवेश तिकीटासाठी ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे परतताना पैसे देण्याचे आश्वासन देऊन दोघेही गडावर गेले.

सुरक्षा कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चेतन चौधरी(Chetan Choudhari) यानेही व्यायामासाठी आल्याचे सांगत तिकीट न घेता प्रवेश केला होता. त्यानेदेखील परतताना पैसे देण्याचे सांगितले होते. मात्र घटनेनंतर तो घाईघाईने निघून गेला आणि तिकीटाचे पैसे न भरताच तेथून निसटल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या माहितीनंतर तपासातील अनेक मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

News title : Siya Goyal Reaction Raises New Questions

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now