सिया गोयलच्या भावाला 10 कोटींची कायदेशीर नोटीस; नेमकं काय घडलं?

On: June 30, 2026 10:49 AM
Siya Goyal brother
---Advertisement---

Siya Goyal brother | पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला आता नवे कायदेशीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणारे अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. न्यायालयातील घडामोडींनंतर हा वाद अधिकच चिघळल्याचे पाहायला मिळत आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

सोमवारी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या वतीने बाजू मांडण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्याकडे सियाचे अधिकृत वकीलपत्र नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला.

यानंतर न्यायालयात सिया गोयलने स्पष्टपणे सांगितले की, “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून अॅड. विपुल दुशिंग आहेत.” या वक्तव्यानंतर न्यायालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

साहिल गोयलला 10 कोटींची नोटीस

या घटनेनंतर अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटिशीनुसार, साहिल गोयलने आपल्याविरोधात खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्यामुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली असून, 48 तासांच्या आत सार्वजनिक माफी मागावी, आरोप मागे घ्यावेत आणि भविष्यात असे आरोप करणार नसल्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे.

आरोपींची पोलीस कोठडी वाढली

दरम्यान, न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल यांना दरीत ढकलल्याचा आरोप या दोघांवर आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स, व्हॉट्सॲप चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक माहितीची तपासणी केली जात आहे. तसेच सिया गोयलच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली आहे.

News Title: Siya Goyal brother gets legal notice of Rs 10 crore New twist after court dispute

Join WhatsApp Group

Join Now