Sitaram Dalvi passed away l राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज दुःखद निधन झालं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सीताराम दळवी यांचे निधन :
माजी आमदार सीताराम दळवी हे अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी दणदणीत विनय मिळवला होता. याशिवाय ते मुंबई महापालिकेत नगसेवक म्हणून देखील विजयी झाले होते. माजी आमदार सीताराम दळवी यानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ काम केले होते.
याशिवाय माजी आमदार सीताराम दळवी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्ठवंत शिवसैनिकांपैकी ते एक होते. तसेच शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता.
Sitaram Dalvi passed away l आज राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार :
सीताराम दळवी हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आरोस या गावचे असून ते मुंबईतील अंधेरी पूर्व येथे अखेरपर्यंत वास्तव्य होते. तसेच सीताराम दळवी हे मनसे नेते संदिप दळवी यांचे वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार, सुना व नातवंडे आहेत. तसेच आज संध्याकाळी 6 वाजता अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
News Title – Sitaram Dalvi passed away
महत्त्वाच्या बातम्या-
आरक्षणाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कॉँग्रेस 50 टक्के..”
दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 5 लाखात ही भन्नाट कार!
छोटा पुढारी झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये! ‘या’ बड्या नेत्याच्या बायोपिकमध्ये दिसणार
बोपदेव घाट गँगरेप प्रकरणी हादरवणारा खुलासा समोर; पीडितेला खुनाची धमकी दिली अन्…
खरेदीदारांना झटका! सोनं गेलं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर






