Sita Navami 2025 | सीता नवमीच्या दिवशी खास पूजाअर्चा व उपाय केल्याने इच्छित जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. विवाहात अडथळे येत असतील, तर या दिवशी काही धार्मिक उपाय नक्की करून पहा. या दिवशीचे धार्मिक महत्त्व आणि त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर होणारा प्रभाव जाणून घ्या. (Sita Navami 2025)
सीता नवमी शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, सीता नवमी हा दिवस माता सीता यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. वैशाख शुक्ल नवमीला होणारी ही पूजा यंदा 5 मे 2025 रोजी सकाळी 7:35 वाजता सुरू होऊन 6 मे रोजी सकाळी 8:38 वाजता संपेल. या दिवशी माता सीतेच्या पूजेसोबत व्रत केल्यास सुखी वैवाहिक जीवन आणि सौभाग्य प्राप्त होते.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. भगवान राम व माता सीतेचे चित्र वा मूर्ती समोर ठेवून पूजा करा. पूजेनंतर माता सीतेला 16 श्रृंगार अर्पण करून ‘ॐ श्रीं ह्रीं श्री जानकी रामभ्यां नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. यासोबतच जानकी स्त्रोत्राचे पठण केल्याने विशेष लाभ मिळतो.
जर प्रेमविवाहात अडथळे येत असतील, तर या दिवशी उपवास करून दोघांची एकत्रित पूजा करा. माता सीतेला साजिरी चुनरी अर्पण करा व हळदीचे गोळे पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. या उपायांनी विवाहाची शक्यता प्रबळ होते.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करा
माता सीतेला लाल वस्त्र व सौंदर्य प्रसाधने अर्पण करा
नैवेद्य म्हणून मखाण्याची खीर व सात्विक पदार्थ अर्पण करा
व्रत केल्यास दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करा
जानकी स्त्रोत्र, सीता चालीसा व रामरक्षा स्तोत्राचा जप करा
Title : Sita Navami 2025 Remedies for Early Marriage






