उन्हाळ्यात दिवसभर एसीमध्ये बसताय?; होऊ शकतात ‘हे’ मोठे आजार

On: May 3, 2024 6:58 PM
Side Effects of AC
---Advertisement---

Side Effects of AC | तापमानात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे उन्हात बाहेर पडण खूप अवघड झालं आहे. बरेच जण थंडावा मिळावा म्हणून, दिवसभर घरात एसी चालू ठेवतात. ऑफिसमध्ये देखील एसी संपूर्ण दिवस चालूच असतो. उन्हाळ्यात एसी तुम्हाला गारवा तर देते पण यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजरांना बळी पडू शकता.

पूर्ण दिवस एसीमध्ये बसून राहिल्याने अनेक आजार होतात. एसीमध्ये दीर्घ काळ बसल्याने शरीराला खूप हानी होते. या लेखात याबाबत सविस्तर सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील जास्त वेळ एसीमध्ये न बसता पंख्याच्या हवेखाली बसायला हवं.

जास्त वेळ एसीत राहाल तर महागात पडेल

डिहायड्रेशन : एसी हवेत जास्त वेळ राहिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. एसीच्या हवेत जास्त (Side Effects of AC ) वेळ बसल्याने व्यक्तीला तहान लागत नाही. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन होते. तसंच मायग्रेनची समस्या देखील वाढू शकते.

ड्राय स्किन : दीर्घकाळ एसीच्या संपर्कात राहिल्याने शरीरातील आर्द्रता नष्ट होऊ लागते. त्यामुळे त्वचा कोरडी होते.त्यामुळे सुरकुत्या आणि फाइन लाइन दिसू लागतात.

लठ्ठपणा : एसीचा जास्त वापर केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. कारण, कमी तापमानामुळे व्यक्तीचे शरीर अधिक सक्रिय होऊ शकत नाही. त्यामुळे शरीरातील ऊर्जेचा योग्य वापर होत नाही आणि शरीरात चरबी वाढू लागते.

सांधेदुखी : एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने सांधे (Side Effects of AC ) आणि कंबरेमध्ये वेदना होऊन शरीरात क्रॅम्प येतात. सांधेदुखीचा त्रास असलेले व्यक्ती जास्त वेळ एसीमध्ये बसले तर त्यांना याचा त्रास अजूनच वाढतो.

News Title – Side Effects of AC

महत्त्वाच्या बातम्या –

उद्योगपती अदानी यांना मोठा दणका; ‘या’ 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटिस

चित्रा वाघ यांनी तोंड उघडलं त्यांचे खूप आभार…- किरण माने

कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट; श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची राजकीय खेळी?

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ

Join WhatsApp Group

Join Now