निकाल लागताच राजकीय भूकंप! ठाकरे गटाच्या ‘या’ नगराध्यक्षाने निवडून येताच ठाकरेंची साथ सोडली

On: December 21, 2025 4:17 PM
Shrivardhan Election Result 2025
---Advertisement---

Shrivardhan Election Result 2025 | महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महायुतीने बाजी मारत महाविकास आघाडीला मोठा फटका दिला आहे. राज्यभरात 200 हून अधिक ठिकाणी महायुतीतील पक्ष विजयी झाले असून, या निकालांमध्ये एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या शिवसेनेची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातून ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Shrivardhan Election Result 2025)

निवडणूक निकाल जाहीर होत असतानाच श्रीवर्धन नगरपरिषदेत ठाकरे गटाकडून विजयी झालेले नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शवली असून, त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे. कोकणात आधीच ठाकरे गटाची पकड सैल होत असताना, या घडामोडीमुळे राजकीय समीकरणे अधिकच बदलण्याची चिन्हे आहेत.

श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाला जबर धक्का :

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अतुल चौगुले यांनी विजय मिळवला होता. ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत विजयी झाले असले तरी, निकालानंतर काही तासांतच त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. त्यांच्या विजयानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनी अतुल चौगुले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळीच चौगुले शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले. (Atul Chaugule Joins Shinde Shiv Sena)

या निर्णयामुळे कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाने नगराध्यक्ष पद मिळवले असतानाच त्या पदावरील व्यक्तीने पक्ष सोडल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दुसरीकडे शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय फायदा मानला जात आहे.

Shrivardhan Election Result 2025 | भरत गोगावले काय म्हणाले? :

अतुल चौगुले यांच्या संभाव्य पक्षप्रवेशावर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अतुल चौगुले यांच्या रुपाने श्रीवर्धनमध्ये परिवर्तन घडले असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल हा शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता असून तो शिंदे गटात येण्यास उत्सुक आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र चौगुले यांनी दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवली असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, असे गोगावले म्हणाले. (Shrivardhan Election Result 2025)

दरम्यान, श्रीवर्धन नगरपरिषदेचा निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक विजयी झाले आहेत, भाजपचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. आता नगराध्यक्ष अतुल चौगुले शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय ताकद संतुलन बदलण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे ठाकरे गटासाठी हा केवळ पराभव नाही, तर विश्वासघाताचा मोठा धक्का मानला जात आहे.

News Title : Shrivardhan Election Result 2025: Major Setback for Uddhav Thackeray Faction as Winning President Joins Eknath Shinde’s Shiv Sena

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now