Shreyas Talpade | मराठी अभिनेता श्रेयश तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराचा झटका येणं यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र लसीमुळे हृदयविकाराचा झटका येणं नाकारता येत नसल्याचं श्रेयश तळपदे एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला. श्रेयशला (Shreyas Talpade) एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्याने यामागचं कारण एका मुलाखतीत बोलत असताना सांगितलं.
“मी नियमित दारू पित नाही, मला डायबीटिज नाही…”
श्रेयश (Shreyas Talpade) म्हणाला की, “मी नियमित दारू पित नाही. मी कधीतरी दारू पितो. मी तंबाखू खात नाही. सिगारेट ओढत नाही. मधल्या काळात माझं कॉलेस्ट्रॉल वाढलं होतं. आता ते कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात आहे. यासाठी मी औषध घेत आहे.”
“मला दुसरा कोणताही त्रास नाही मला डायबीटिज नाही. बीपीचा त्रास नाही..तर हृदयविकाराचा झटका येण्याचं कारण काय असू शकतं? इतकी सावधगिरी बाळगून आणि स्वत:ची काळजी घेऊन असं होत असेल तर याचं आणखी काय कारण असेल?” असं श्रेयश म्हणाला आहे.
“काही सिद्धांत खरे असतात ते नाकारता येत नाहीत”
त्यानंतर श्रेयशने (Shreyas Talpade) कोविड 19 लसीबाबत वक्तव्य केलं तो म्हणाला की, “काही सिद्धांत असे आहेत की मी ते नाकारू शकत नाही. मला थकवा जाणवू लागला होता. हे तथ्य आपल्याला नाकारता येत नाहीत. आपल्याला काय माहिती नाही आपण लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये काय घेतलं आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे.
“लसीमुळे आपल्याला काही झालं आहे ते ऐकलं नव्हतं. लसींमुळे काय प्रभाव झाले आहेत हे जाणून घ्यायचं आहे. आपल्याकडे पुरावा असेल तर आपण त्यावर बोलू शकतो. आपल्याकडे पुरावा नसेल तर आपल्याला काहीही बोलता येत नाही. तरीही त्या लसीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल हे जाणून घेणं गरजेचं आहे,” असं श्रेयश म्हणाला.
दरम्यान, श्रेयस याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करत एंजियोप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेता पूर्वी प्रमाणे शुटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. तो लवकरच ‘गोलमाल 3’ चित्रपटातून प्रेक्षकांना भेटीसाठी येणार आहे.
News Title – Shreyas Talpade Talk About Heart Attack Connection Covishield Dose
महत्त्वाच्या बातम्या
भन्नाट फीचर्ससह महिंद्रा कंपनीची कार लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये
कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचायं ? तर Vivo कंपनीची जबरदस्त सिरीज लाँच
…तर आता मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत; राज ठाकरेंचं भुवया उंचवणार वक्तव्य
विरोधक म्हणतायेत एक एक वर्षाला पंतप्रधान करायचा; यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नागरिकांनो घराबाहेर पडू नका; आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट






