‘पुष्पाभाऊ’ विरोधात FIR दाखल, अभिनेत्याला होणार अटक?; नेमकं प्रकरण काय?

On: March 28, 2025 9:48 AM
Shreyas Talpade Booked in Crore Fraud Case
---Advertisement---

Shreyas Talpade | ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनला आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. चिटफंड घोटाळ्याप्रकरणी त्याच्यासह 15 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. (Shreyas Talpade)

चिटफंड कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप झाला आहे. महोबा (Mahoba) येथे LUCC नावाच्या चिटफंड कंपनीने नागरिकांना “रक्कम दुप्पट” करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले आणि अचानकपणे गायब झाली. या घोटाळ्यात श्रेयस तळपदे प्रमोटरच्या भूमिकेत होता, अशी माहिती समोर आली आहे.

ही कंपनी “लोनी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी”च्या नावाने कार्यरत होती. गेल्या दहा वर्षांपासून महोबा परिसरात तिचे कार्य सुरू होते. आता संबंधित प्रकरणात कलम 419 आणि 420 (फसवणूक व विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्रेयस तळपदेसह 15 जणांविरोधात FIR

FIR मध्ये श्रेयस तळपदे याच्यासह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आर. के. शेट्टी, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, दालचंद कुशवाह, सुनील विश्वकर्मा, सचिन रायकवार, कमल रायकवार, सुनील रायकवार, महेश रायकवार, मोहन कुशवाह, जितेंद्र नामदेव आणि नारायण सिंह राजपूत यांची नावे नमूद आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पुढच्या सिनेमांमध्ये व्यस्त असलेला श्रेयस तळपदे

या प्रकरणात अडकल्याने श्रेयस तळपदेला झटका बसला असला, तरी वर्कफ्रंटवर तो अजूनही सक्रीय आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यासारखे कलाकार आहेत. याशिवाय तो मराठी रिअॅलिटी शो ‘चल भावा सिटीत’चं (Zee Marathi) सूत्रसंचालन करत आहे. (Shreyas Talpade)

‘पुष्पा’ (Pushpa) आणि ‘पुष्पा 2’ या ब्लॉकबस्टर सिनेमांतून हिंदी डबिंगसाठी श्रेयस तळपदेनं अल्लू अर्जुनला (Allu Arjun) आपला आवाज दिला आणि ‘पुष्पाभाऊ’ म्हणून नवी ओळख निर्माण केली. या आवाजामुळे त्याची लोकप्रियता पुन्हा शिखरावर पोहोचली आहे.

Title : Shreyas Talpade Booked in Crore Fraud Case

 

Join WhatsApp Group

Join Now