दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या दर

On: October 23, 2025 11:40 AM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate | दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज, आणि या शुभ दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोनं-चांदीची खरेदी करतात. मात्र, यावेळी बाजारात चित्र काहीसं वेगळं दिसतंय. दिवाळीपूर्वी सोन्याने जबरदस्त वाढ दाखवली असली तरी आता त्यात घट झाली आहे. तरीही दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

दिवाळीनंतर सोन्याचा बाजार थंडावला

भाऊबीजेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल पाहायला मिळाला. वायदे बाजारात सोन्याच्या दरात Gold Rate) तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. एका दिवसात एवढी मोठी घट पाहायला मिळणे दुर्मिळ आहे. आज सोन्याच्या वायद्याची किंमत १,२२,८०६ रुपये नोंदवली गेली. सुरुवातीला दर कमी झाले असले तरी दिवसाच्या अखेरीस ९०० रुपयांची किरकोळ वाढ दिसली.

दागिन्यांच्या बाजारातही सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी घट झाली आहे. सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर १,१५,३९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याची किंमत(Gold Rate) १,२५,८८० रुपये आहे. दर केवळ १०० रुपयांनी कमी झाले असले तरी, सोनं अजूनही ‘महागड्या लक्झरी’च्या यादीतच आहे. या छोट्या घटीनंही ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही.

Gold Rate | चांदीची चमक मंदावली

चांदीच्या बाजारातही निराशाजनक स्थिती पाहायला मिळत आहे. आज एका किलो चांदीचा दर (Silver Rate) १,५९,९०० रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचे भाव दोन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता अचानकच त्या आशा फोल ठरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या मागणीत घट आणि पुरवठ्यात वाढ झाल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे सध्या चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ मानला जातो. दिवाळीत सोन्याचा योग जुळला नाही, तरी चांदीचा योग मात्र उजळला आहे असं म्हणावं लागेल.

दिवाळीनंतर आता लग्नाचा सिझन सुरु होणार आहे आणि या काळात दागिन्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही आठवड्यांत सोन्याच्या किंमती पुन्हा वर चढू शकतात. सणानंतर थोडीशी विश्रांती घेतलेला बाजार आता पुन्हा तेजीत जाण्याची चिन्हं आहेत.

त्यामुळे सध्याच्या घसरणीचा काळ सोनं खरेदीसाठी योग्य वाटत असला तरी, भविष्यात दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात सोन्याचे भाव कुठे स्थिरावतात, हे पाहणं आता सर्वांच्या उत्सुकतेचं कारण ठरणार आहे.

News Title – Shock on the last day of Diwali; Unexpected jump in gold prices

Join WhatsApp Group

Join Now