पुण्याच्या राजकारणात मोठा स्फोट! भाजप-शिवसेना युती तुटली?

On: December 30, 2025 12:00 PM
Pimpri Chinchwad Election
---Advertisement---

Pune Municipal Election | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र जागावाटपावरून मतभेद वाढल्याने अखेर युती फिस्कटली आहे. पुण्यात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. (PMC Election)

शिवसेनेने पुण्यातील एकूण 165 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून सर्व उमेदवारांना एबी फॉर्म (AB Form) देण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक नेत्यांची भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं चित्र आहे.

जागावाटपावरून तणाव; भाजपकडून फक्त 15,16 जागांची ऑफर :

निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये बैठका आणि चर्चा देखील झाल्या, मात्र भाजपकडून शिवसेनेला केवळ 15 ते 16 जागांची ऑफर देण्यात आल्याने शिवसेनेतील स्थानिक नेते नाराज झाले. 165 पैकी इतक्या कमी जागांवर समाधान मान्य नसल्याचं स्पष्ट झालं. (Pune Municipal Election) 

शिवसेनेने सुरुवातीपासूनच किमान 25 जागांची मागणी केली होती. मात्र भाजपने सन्मानपूर्वक जागावाटप न केल्याने युती टिकवणं अशक्य झाल्याचं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं. ज्या जागा जिंकणं अवघड आहे, त्या जागा शिवसेनेला दिल्या जात असल्याचा आरोपही पक्षातील नेत्यांकडून करण्यात आला आहे.

Pune Municipal Election | कार्यकर्त्यांच्या भावनांना प्राधान्य; एबी फॉर्म वाटपाला सुरुवात :

जागावाटपाच्या निर्णयावर आज पुण्यात शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत (Uday Samant) पुण्यात येणार होते, मात्र त्याआधीच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेत युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय अधिकृत केला आहे. (Shiv Sena BJP Alliance Break)

शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी पुण्यात शिवसेना 165 जागा लढवणार असून सर्व इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती दिली आहे. एबी फॉर्म वाटपासाठी शहराध्यक्ष आणि उपनेते बाहेर पडल्याने पुण्यात निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हं आहेत.

News Title: Shiv Sena Breaks Alliance with BJP in Pune, to Contest 165 Seats Independently in PMC Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now