Shirish Maharaj More | जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांच्या आत्महत्येने अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येची कारणे समोर आली असून, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्यांमधून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, हे स्पष्ट केले आहे. देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर, आर्थिक विवंचनेतून (Financial Crisis) त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) नमूद केले होते.
या घटनेनंतर समाजमाध्यमे आणि समाजात त्यांच्या कर्जबाजारीपणाची चर्चा रंगली आहे. मात्र, “शिरीष महाराजांनी कोणाचेही कर्ज बुडू नये याची काळजी घेत, आपल्यावरील कर्ज फेडण्याचे आवाहन निकटवर्ती आणि कुटुंबीयांना केले. यातून त्यांच्या मनातील आणि संस्कारांतील संत तुकाराम महाराजांचा (Sant Tukaram Maharaj) आदर्श दिसून येतो,” असे म्हणत मोरे कुटुंबीयांनी (More Family) या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, या दुर्दैवी घटनेनंतर कर्जबाजारीपणाची होणारी चर्चा वेदनादायी आणि दु:खद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘कर्ज फेडावे, कोणावर अन्याय नको’
शिरीष महाराज मोरे यांनी जगाचा निरोप घेताना, ‘माझ्यामागे प्रत्येकाने दिलेले कर्ज फेडावे,’ असे म्हणून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली. यातून त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली, असे मोरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
“शिरीष महाराजांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, असे म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत आहे. अनेकजण कीर्तनातून मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तनसेवा दिली. फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता,” अशी खंतही देहूकरांनी व्यक्त केली आहे. (Shirish Maharaj More)
पोलिसांचा तपास सुरू:
दरम्यान, शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस (Dehuroad Police) पुढील तपास करत आहेत.
Title : Shirish Maharaj More Family Reacts to Discussions on His Suicide








