शिर्डी हादरली! घरगुती वादातून मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

On: March 11, 2025 2:44 PM
Ahilyanagar Crime News
---Advertisement---

Shirdi Crime | शिर्डी (Shirdi) पुन्हा एकदा खळबळजनक घटनेने हादरली आहे. घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची पाईपने बेदम मारहाण करून हत्या केली. या घटनेनंतर हत्या लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शवविच्छेदन अहवालातून सत्य उघडकीस आले आहे. (Shirdi Crime )

दत्तात्रय शंकर गोंदकर (वय 54) असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी शुभम गोंदकर (मृताचा मुलगा) याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. 6 मार्च रोजी रात्री 8 वाजता हा सर्व प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हत्या लपवण्याचा प्रयत्न फसला!

शुभम गोंदकर याने घरगुती वादातून वडिलांना पाईपने जबर मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याने हत्या दडवण्याचा प्रयत्न करून हा अकस्मात मृत्यू असल्याचे सांगितले.

पाच दिवसांनी शवविच्छेदन अहवाल समोर आला आणि मारहाणीतूनच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी स्वतः फिर्याद नोंदवत शुभम गोंदकरवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला.

महिनाभरात दुसरे हत्याकांड!

शिर्डीत गेल्या महिन्यात 3 फेब्रुवारीरोजी साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची चाकूने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या महिन्यात 6 मार्चला ही दुसरी घटना घडली. पोटच्या मुलाने वडिलांची हत्या करून ती लपवण्याचा प्रयत्न केला. या घटनांमुळे शिर्डी शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Title : Shirdi Crime Son Kills Father Over Family Dispute

 

Join WhatsApp Group

Join Now