शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा

On: May 25, 2024 2:56 PM
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Rumors
---Advertisement---

Shikhar Dhawan | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार प्लेयर तथा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. मात्र, त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे तो कायमच चर्चेत राहिला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात देखील त्याला छाप सोडता आलेली नाही.

2024 च्या आयपीएल हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र, हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला लागली. सध्या क्रिकेटपासून दूर असलेला शिखर धवन त्याच्या शोमुळे चर्चेत आहे.

शिखर धवन आणि मिताली राजसोबत लग्न करणार?

जिओ सिनेमाच्या ‘धवन करेंगे’ या शोमधील एका मुलाखतीत शिखर धवन याने मोठा खुलासा केलाय. यात तो म्हणाला की, त्याने एकदा एक अफवा ऐकली होती की, तो भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत (Mithali Raj) लग्न करतोय. शिखरने या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलंय.

मिताली राज महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक असून निवृत्तीनंतर समालोचन आणि मेंटरशिपमध्येदेखील तिने छाप सोडलीये. अशात मिताली आणि शिखरबद्दल काही चर्चा रंगत होत्या. त्यावर शिखरने (Shikhar Dhawan) स्वतः खुलासा केलाय.

काय म्हणाला शिखर धवन?

‘धवन करेंगे’ शोमध्ये मिताली राज आणि शिखर धवन यांनी दोघांनी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. ‘मी ऐकलं आहे की, माझं लग्न मिताली राज हिच्यासोबत होणार आहे….’, असं शिखर म्हणाला. यावर दोघेही मोठ्याने हासू लागतात. शोमध्ये शिखर याने ऋषभ पंत याचं देखील कौतुक केलं.

‘अपघातानंतर त्याने स्वतःला ज्या प्रकारे सांभाळलं आहे, त्याचं मला कौतुक वाटतं. त्याने ज्या प्रकारे पुन्हा पदार्पण केलं केले आणि आयपीएलमध्ये खेळून भारतीय संघात स्थान मिळवले ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. मला ऋषभ याचा खूप अभिमान आहे.’, असं शिखर म्हणाला.सध्या शिखर आणि मिताली यांची ही मुलाखत चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

दरम्यान, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला असून त्यांना जोरावर नावाचा मुलगा देखील आहे. नऊ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आयशाचा शिखर धवनशी दुसरा विवाह होता. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. सध्या शिखर एकटा आयुष्य जगतोय.

News Title :  Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Rumors

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘या’ लिंकवर पाहा गुण

बायकोमुळे हार्दिक पांड्या कंगाल होणार?, सोशल मीडियावर एका गोष्टीची जोरदार चर्चा

पुण्यानंतर नागपुरातही ‘हिट अँड रन’, मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं

काळजी घ्या! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट येणार

उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, ‘या’ नेत्याचं निधन

Join WhatsApp Group

Join Now