उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, ‘या’ नेत्याचं निधन

On: May 25, 2024 1:12 PM
Pandurang Sakpal passed away
---Advertisement---

Pandurang Sakpal | उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal)यांनी आज शनिवारी, 25 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

निष्ठावंत शिवसैनिक पांडुरंग सपकाळ यांचं निधन

शिवसेनामध्ये जेव्हा फुट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखत पांडुरंग सकपाळ यांनी आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं दाखवून दिलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

एक कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांची दक्षिण मुंबईत ओळख होती. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड केली.

बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळख

विभागप्रमुख पद काढून घेतल्यानंतर पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) कोणत्याच कार्यक्रमात सक्रिय दिसले नाहीत. त्यांनी अनेक आंदोलन गाजवली आहेत. पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धा आयोजित केली होती, यामुळे यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यांच्या निधनाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केलाय. “पांडुरंग सकपाळ..धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला.अनेक आंदोलनात पोलिसांचा मार खाल्ला, तुरुंग भोगला. पण, पांडुरंग मागे हटला नाही.पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता.असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला. विनम्र श्रद्धांजली!” अशी पोस्ट संजय राऊत यांनी केलीये.

News Title- Pandurang Sakpal passed away

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

अग्रवालांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं!, धक्कादायक घटनाक्रम आला समोर; पोलिसांकडून आता आजोबाला अटक

आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर मोठी कारवाई!

भर स्टेडियममध्ये जान्हवी कपूरसोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ तूफान व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now