Sharad Pawar | अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. आज सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्याआधीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
शरद पवार शपथविधीला जाणार नाहीत :
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच या संदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले होते.
Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय हालचालींना वेग :
दरम्यान आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आज मुंबईला जाणार नाहीत आणि त्यामुळे ते सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी औपचारिक निवड झाली आहे. आज सायंकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होणार असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.






