शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर!

On: February 23, 2026 12:52 PM
Sharad Pawar Health Update
---Advertisement---

Sharad Pawar Health Update | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.

डॉक्टरांची माहिती आणि सध्याची स्थिती :

शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) येथे उपचार सुरू आहेत. काल त्यांना उलट्यांचा त्रास झाल्याने शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची तब्येत सध्या स्थिर आहे. त्यांनी पुरेसा आराम केला असून सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक आले आहेत. ते नियमित आहार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. पुढील दोन दिवस विश्रांतीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवस ते पुण्यातच राहतील आणि मग मुंबईकडे रवाना होतील, असेही डॉक्टरांनी सांगितले.

Sharad Pawar Health Update | नेमके काय झाले होते? :

उलट्यांमुळे झालेल्या डिहायड्रेशनमुळे त्यांना सलाईन देण्यात आली. रक्ततपासणी तसेच सिटीस्कॅनसह सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या सर्व तपासण्यांचे निकाल सामान्य आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही गंभीर चिंता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Sharad Pawar Health Update News)

यापूर्वीही प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात छातीत कफ झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आले होते आणि पाच दिवस उपचार करण्यात आले होते. त्यावेळीही प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. आता पुन्हा उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील 48 तासांत डिस्चार्ज मिळणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

News title : Sharad Pawar to Be Discharged Soon

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now