Sharad Pawar | राज्यासह देशात चौथ्या टप्प्याचं मतदान हे तोंडावर आले असून काही तास उरले आहेत. चौथ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता काही तास उरले असल्याने प्रचारसभांच्या तोफा थंडावल्या आहेत. तर आता पाचव्या म्हणजेच अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारांना आज रविवार असल्याने सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी कल्याणमध्ये प्रचारसभा घेताना दिसत आहेत. तर अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील भिवंडी येथे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे.
राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी सभा घेत विरोधक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि नरेंद्र मोदींवर बोलत असताना एक वक्तव्य केलं आहे. त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचं काम करताना दिसत असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
भिवंडी येथे सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. या तालुक्यात काही प्रश्न जसेच्या तसे आहेत. जिल्ह्याचे दोन भाग झाले तरीही परिस्थिती तशीच आहे. नरेंद्र मोदी हे केवळ भाजपसाठी काम करतात. निवडणूक जवळ आली की टीका करत असतात. काम काय केलं? यावर ते बोलत नाहीत. याआधी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदीरा गांधी हे विकासाच्यामुद्द्यावर बोलत असायचे. त्यांचं काम मला जवळून पाहता आलं. मात्र नरेंद्र मोदी हे नुसत्या टीका करताना दिसतात. असा पहिला पंतप्रधान मी पाहिला असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे देखील काय काम केलं हे दाखवत नाहीत, टीका करतात असं शरद पवार म्हणाले.
“महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचं काम मोदी करतात”
संसदेतील लोकशाहीवर आघात केल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. त्यानंतर बाळ्या म्हात्रे म्हणजेच सुऱेश म्हात्रे यांना निवडून देण्याबाबत भिवंडी सभेतील उपस्थितांना आवाहन केलं आहे.
त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भिवंडीतील सभेत बोलत असताना त्यांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत. यावेळी मतदारसंघात 100 टक्के बदल दिसत आहे. कमळ फुलणार नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना निरेप देण्याची वेळ आली आहे. मोदी हटाव देश बचाओ अशा घोषणा जनता देते. सत्यमेव जयतेपेक्षा भाजपने असत्यमेव जयते हे ब्रीद पुढं नेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
शेतकरी आत्महत्या करत आहेत मोदी त्यावर काहीही बोलत नाहीत. महाराष्ट्रात बेरोजगारी आहे त्यावर मोदी काहीही बोलत नाहीत. आदिवासी समुदायाला जमिनीचा हक्क नाकारला त्यावर मोदी काहीही बोलत नाहीत. 2014 साली किती महागाई होती, आता किती महागाई झाली आहे ते पहावं. आम्हाला 2014 चे अच्छे दिन नकोत आम्हाला 2014 च्या आधीचे दिवस द्या, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
News Title – Sharad Pawar On BJP And Narendra Modi Bhiwandi Loksabha 2024
महत्त्वाच्या बातम्या
“राजकारणी आहात की गावगुंड, अजित पवारांना निवडणूक जड जाणार”
नुडल्स खाणं जीवावर बेतलं, धक्कादायक घटना समोर
महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
“चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, तेरे नाम भांग पाडून फिरत असतात”
भरसभेत Love You Too असं देवेंद्र फडणवीस कोणाला म्हणाले?, नेमकं काय घडलं?






