शरद पवार थेट जंतर-मंतरवर! अभिजित दीपकेंसोबत चर्चा; नक्की काय घडलं? वाचा सविस्तर

On: July 21, 2026 4:13 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलनस्थळी भेट देत अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आंदोलनाच्या मागण्या आणि पुढील भूमिका यावर दोघांमध्ये संवाद झाला.

आंदोलनाच्या मागण्या शरद पवारांसमोर मांडल्या :

भेटीदरम्यान अभिजित दिपके यांनी आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांची माहिती शरद पवार यांना दिली. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दिल्ली आणि मुंबई (Mumbai) येथील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा, आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी आणि देशभरातील आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर (FIR) मागे घेण्यात यावेत, अशा चार प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या.

यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील सुमारे 30 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कोणतेही आवाहन न करता आंदोलन झाल्याचा उल्लेख केला. आंदोलनकर्त्यांना कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि हे आंदोलन आणखी किती दिवस सुरू ठेवण्याचा विचार आहे, असे प्रश्न त्यांनी अभिजित दिपके यांना विचारले. त्यावर उत्तर देताना दिपके यांनी आपण मागील 31 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत असल्याचे सांगितले. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर सरकारविषयी नाराजी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. आंदोलनाचा उद्देश केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar | विरोधी पक्षांचा वाढता पाठिंबा :

जंतर-मंतरवरील आंदोलनाला विविध विरोधी पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shiv Sena UBT) यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मंगळवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जंतर-मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतल्यानंतर आता शरद पवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यामुळे या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून मिळणारा पाठिंबा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

News Title: Sharad Pawar Meets Abhijit Dipke

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now