शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर; नेमका काय त्रास होतोय?

On: February 9, 2026 6:34 PM
Sharad Pawar Health Update
---Advertisement---

Sharad Pawar Health Update | खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बारामतीतून तातडीने पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी आणि दुपारी डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

तपासणीत काय निष्पन्न झालं? :

रुग्णालयात दाखल होताना शरद पवार व्हीलचेअरने आत गेले. त्यांच्या पत्नी तसेच खासदार सुप्रिया सुळे याही रुग्णालयात उपस्थित आहेत. प्राथमिक तपासण्यांचे रिपोर्ट समोर आल्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाईल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुप्रिया सुळे यांनीही डॉक्टरांच्या सूचनेनुसारच सर्व उपचार केले जातील, असे सांगितले. (Sharad Pawar Health Update)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकला आणि श्वास घेण्यास थोडा त्रास जाणवत आहे. मात्र सध्या कोणतीही गंभीर बाब समोर आलेली नाही. ते खाजगी रूममध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Sharad Pawar Health Update | हेल्थ रिपोर्टमध्ये काय दिसतंय? :

प्राथमिक अहवालानुसार, त्यांचा हार्ट रेट सुमारे 74 प्रति मिनिट असून तो सामान्य मर्यादेत आहे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे 98 टक्के आहे, जे समाधानकारक मानले जाते. (Sharad Pawar Health Update)

मात्र श्वसनगती सुमारे 26 प्रति मिनिट असून ती सामान्यपेक्षा जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून सातत्याने निरीक्षण आणि उपचार सुरू ठेवण्यात येत आहेत.

News Title: Sharad Pawar Health Update: No Visitors Allowed, Doctors Share Test Results

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now