Sharad Pawar | लोकसभेच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. अशात राज ठाकरे देखील आता महायुतीकडून असल्याने त्यांनीही मविआवर बाण सोडले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या शिंदे गटाने आयोजित केलेल्या प्रचारसभेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यांनी कल्याणमधील सभेत बोलताना शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती.
राज ठाकरेंच्या या टीकेला शरद पवारांनी दोनच शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार आज (16 मे ) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा देखील समाचार घेतला.
काय म्हणाले शरद पवार?
“राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते मला माहिती नाही. राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही. मी असं ऐकलं होतं की त्यांचा नाशिकमध्ये स्ट्राँग बेस आहे . मात्र मला हल्ली नाशिकमध्ये ना ते दिसतात ना त्यांचा पक्ष.”, असा टोला यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी लगावला.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यालाच शरद पवारांनी आज प्रत्युत्तर दिलं. तसंच मोदी यांनी आगामी काळात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होणार, असं म्हटलं होतं. पवारांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली.
“काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत. मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय.काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरले आहेत. त्यामुळे सारख्या विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करायला हवा, असा सल्ला मीच दिला होता. तसं करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही.”, असं शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले आहेत.
News Title – Sharad Pawar criticizes Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या-
“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींनी..”, संजय राऊत संतापले
राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट
केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट
क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत
मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?






