Sharad pawar And Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले प्रचारात व्यस्त आहेत. मात्र अशा स्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sharad pawar And Uddhav Thackeray) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर निघूण जाण्यास सांगितलं असल्याचा धक्कादायक दावा भाजप नेत्याने केला आहे. (Sharad pawar And Uddhav Thackeray)
x ट्विटरवर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओ हा 12 सेकंदाचा असून त्या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा भाजप नेते जितेन गजारिया यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे हा व्हिडीओ खोटो असल्याचा दावा केला जातोय.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
व्हिडीओ पाहिल्यास लक्षात येतं की शरद पवार एका खोलीमध्ये बसले आहेत. उद्धव ठाकरे त्याठिकाणी नमस्कार करताना दिसत आहेत. त्यावेळी शरद पवार यांनी त्यावेळी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे तिथून बाहेर निघून गेले. त्यावर आता भाजपचे नेते जितेन गजारिया म्हणाले की शरद पवार यांनी विनंम्रता पूर्वक बाहेर जाण्यास सांगितलं आहे. तेव्हा गजारिया यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा व्यवहार करत आहेत, असं कॅप्शन लिहिलं (Sharad pawar And Uddhav Thackeray)
Sharad Pawar politely telling Uddhav Thavkeray to get out as he is busy. pic.twitter.com/8QKcLqp5li
— Jiten Gajaria -Modi Ka Parivar (@jitengajaria) May 3, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “काय दिवस आले आहेत? शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना वाट पाहायला लावली आहे”.
तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, “पुढे पाहा उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार काय करणार”. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की राज्यातील प्रत्येक मतदाराने हा व्हिडीओ पाहावा.
This is how Uddhav Thackeray is being treated by Sharad Pawar.
He was getting respect from PM Modi and HM Amit Shah which he could not digest. pic.twitter.com/sY7xfifFJa
— Trupti Garg (@garg_trupti) May 3, 2024
गेल्या काही दिवसांआधी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू होती. सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आहे. मात्र ती जागा ठाकरे गटाला दिली आणि त्याजागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. अशातच आता काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र ठाकरे गटाला सांगलीची जागा दिली. यामुळे आता विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
News Title – Sharad pawar And Uddhav Thackeray Video Viral
महत्त्वाच्या बातम्या
हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये ‘या’ कलाकारांनी गमावलाय जीव; अपघात इतका भीषण की शरीराचा एक अवयवही..
..अन् थोडक्यात अनर्थ टळला! भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
“लग्नानंतरचे अनैसर्गिक संबंध गुन्हा नाही”; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
“मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलंय?”; मोदींच्या टीकेवर शरद पवार यांचं जशास तसं प्रत्युत्तर






