Sharad Mohol | “खचून जाऊ नका, तर…”, शरद मोहोळच्या कार्यकर्त्यांना नितेश राणेंचा मोठा सल्ला

On: January 8, 2024 8:23 PM
Sharad Mohol
---Advertisement---

Sharad Mohol | कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर पुण्यात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्मण झालं आहे. शरद मोहोळ याच्या हत्यानंतर पुणे पोलिसांनी मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान शरद मोहोळच्या हत्येनंतर भाजपमधील काही राजकीय नेत्यांनी मोहोळ कुटुंबाची भेट घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले की, “आज कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मोहोळ कुटुंबीयांचं सांत्वन करायला मी आलो आहे. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता आणखी काम करावं.

“शरद मोहोळ यांची चुकीची प्रतिमा दाखवली जातेय”

पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत. मोहोळ कुटुंबीयांचं हिंदु समाजासाठी मोठं काम असल्याचं सांगत नितेश राणे यांनी म्हटलं की, “शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे.

पुढे राणे म्हणाले की, “शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो.” स्वाती मोहोळ यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली.

स्वाती मोहोळ यांनी केले गंभीर आरोप

स्वाती मोहोळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे खळबळ माजली आहे. माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली असल्याचा आरोप शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे.

समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार, असं त्या म्हणाल्यात.

News Title : sharad mohol bjp mla gives his first reaction

महत्त्वाच्या बातम्या-

Sharad Mohol | माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे- स्वाती मोहोळ

Pune News | शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नीने दिली मोठी प्रतिक्रिया, शेवटच्या श्वासापर्यंत…

Sharad Mohol | शरद मोहोळच्या बायकोचा अत्यंत खळबळजनक आरोप!

Raj Thackeray | “थेट, परखड आणि 100 टक्के…”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं राज ठाकरेंचं कौतुक

‘लक्षद्वीप-मालदीव’ प्रकरणी Amitabh Bachchan यांचं मोठं वक्तव्य!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now