अजित पवारांची मोठी खेळी; रात्रीच्या ‘त्या’ गुप्त भेटीने भाजपची झोप उडवली!

On: January 9, 2026 11:20 AM
Ajit Pawar Plane Crash
---Advertisement---

Ajit Pawar | पुणे (Pune) शहरात सध्या भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पुण्यातील एक बडा भाजप नेता राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.

गुप्त भेटीने राजकीय खळबळ :

पुण्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) आणि अजित पवार यांच्यात काल रात्री गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडल्याचे सांगितले जात असून, या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, बुट्टे पाटील तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा “स्वगृही” म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी समोर येताच भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच आता आपल्या पक्षातील नेत्यांची चिंता भेडसावत असल्याचे बोलले जात आहे. पुण्याच्या राजकीय रणांगणात अजित पवार यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हालचाली सुरू केल्याचे संकेत या भेटीमधून मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुणे जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ajit Pawar | जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली :

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडताना दिसत आहेत. प्रत्यक्षात, खेड तालुक्यातील वराळे येथे होणारी बैठक अचानक रद्द करून ही चर्चा पुण्यात जिजाई निवासस्थानावर घेण्यात आली. यामुळे या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार आणि शरद बुट्टे पाटील यांचे जुने व विश्वासाचे संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती.

पूर्वी पदवीधर निवडणुकीत संधी न मिळाल्याने नाराज झालेले शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली होती. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूकही लढवली होती. आता मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीआधी त्यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पुनप्रवेशासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) आणि शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी सक्रिय भूमिका घेतल्याची माहिती आहे.

जर हा प्रवेश प्रत्यक्षात झाला, तर भाजपसाठी तो मोठा धक्का ठरणार असून, अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे मानले जात आहे.

News Title: Sharad Butte Patil Rejoin NCP

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now