सूर्यग्रहण व शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग, ‘या’ राशींचं वाढणार टेंशन?; करा ‘हे’ उपाय

On: March 29, 2025 10:55 AM
Shani Uday 2026
---Advertisement---

Shani Sade Sati 2025 | आज29 मार्च 2025 हा दिवस राशीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानला जात आहे. एकीकडे मकर राशीवरील साडेसाती संपत असली तरी मीन राशीसाठी अडचणींची सुरुवात होणार आहे. शनि संक्रमण, सूर्यग्रहण आणि शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग यंदा एकाच दिवशी आला आहे. (Shani Sade Sati 2025)

शनि-सूर्य एकत्र मीन राशीत, संकटाचे संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार (Jyotish Shastra), शनि (Shani) दर अडीच वर्षांनी एक राशी बदलतो आणि यावेळी त्याचा प्रवेश मीन राशीत (Meen Rashi) होतो आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सूर्यग्रहण (Solar Eclipse) देखील मीन राशीत होत आहे आणि सूर्य या राशीत आधीपासून उपस्थित आहे. त्यामुळे सूर्य आणि शनि या परस्पर विरोधी ग्रहांचा एकत्रित परिणाम होणार आहे. या योगायोगामुळे मीन राशीसाठी पुढचे काही महिने अत्यंत कठीण ठरू शकतात.

29 मार्चपासून मीन राशीत सुरू होणारा शनि-सूर्य संयोग खूप धोकादायक मानला जातो. या संयोगामुळे आरोग्य बिघडणे, आर्थिक अडचणी, अपघात, मानसिक तणाव अशा घटनांचा धोका वाढतो. 14 एप्रिलपर्यंत सूर्य मीन राशीत राहणार असल्याने शनि-सूर्य युतीचा तीव्र परिणाम दिसू शकतो.

साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू, मीन राशींसाठी काळजीचा काळ

शनि मीन राशीत प्रवेश करताच मीन राशीवरील साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. हा टप्पा अत्यंत त्रासदायक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी आर्थिक नुकसान, कर्जबाजारी होणे, व्यावसायिक अडथळे, मानसिक अशांतता, वैयक्तिक नात्यांमध्ये ताण अशा समस्या संभवतात.

या काळात आर्थिक व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करावेत. स्वप्नाळूपणा टाळून वास्तववादी विचार करावा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावं. अहंकारामुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो. नवीन गुंतवणुकीपासून दूर राहणंच हितावह ठरेल.

शनीच्या प्रभावापासून बचावाचे उपाय

शनीच्या अशुभ परिणामांपासून बचावासाठी हनुमान चालिसा नियमित वाचावी. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली काळ्या तीळांसह मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गरजूंना अन्न, कपडे किंवा मदतीचा हात द्या. कोणतेही अनैतिक, चुकीचे किंवा गैरकायद्याचे काम करू नये. (Shani Sade Sati 2025)

मीन राशीच्या व्यक्तींनी पुढील अडीच वर्षे विशेषतः सावध राहणे गरजेचे आहे. तसेच, ज्योतिष सल्ल्यानुसार कृती केल्यास संकटांची तीव्रता कमी करता येऊ शकते.

Title : Shani Sade Sati 2025 Trouble for Pisces

 

Join WhatsApp Group

Join Now