Shaktipeeth Highway | महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध दर्शवण्यासाठी 12 जिल्ह्यांतील शेतकरी मुंबईत (Mumbai) एकवटले आहेत. “आमच्या घरांची राखरांगोळी करून महामार्ग बनवू नका,” असा इशारा देत, त्यांनी हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे.
महामार्ग रद्द करा- शेतकरी
शेतकऱ्यांनी सांगितले की, “आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने हा महामार्ग रद्द करावा. अन्यथा, मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही.”
कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur), सांगली (Sangli), सिंधुदुर्ग, यवतमाळ (Yavatmal), वर्धा, बीड (Beed), परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावरून (Azad Maidan) विधिमंडळावर मोर्चा काढला.
मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत (Legislative Council) सांगितले की, “सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, तो कुणावरही लादायचा नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू.”
ते पुढे म्हणाले की, “हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे आणि तो होणारच.” त्यांनी असेही सांगितले की, कोल्हापूर विमानतळावर सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी महामार्ग होण्यासाठीचे निवेदन दिले होते. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.
Title : Shaktipeeth Highway Farmers Protest in Mumbai CM Assures to Resolve Issues









