40 वर्षीय कोरिओग्राफर अजूनही अविवाहित; लग्न न करण्याचं सांगितलं कारण, म्हणाली…

On: April 14, 2026 12:18 PM
Shakti Mohan
---Advertisement---

Shakti Mohan | ‘डान्स इंडिया डान्स २’ (Dance India Did 2) या गाजलेल्या शोची विजेती ठरल्यानंतर नृत्यदिग्दर्शन क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारी शक्ती मोहन (Shakti Mohan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका डान्स स्टुडिओची यशस्वी मालकीण असलेल्या शक्तीने वयाच्या ४० व्या वर्षीही लग्न केलं नाही. तिने लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला? याविषयी अलीकडेच भाष्य केलं.

वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक मानसिकतेवर भाष्य

सिद्धार्थ कन्नन (Siddharth Kannan) याच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना शक्तीने सांगितले की, तिला सतत लग्नाबद्दल विचारणा केली जाते. तिचे वडील आणि आई देखील तिला जोडीदार निवडण्याबाबत वारंवार सुचवत असतात, परंतु सध्या ती तिच्या कामात आणि स्टुडिओच्या व्यवस्थापनात पूर्णपणे समाधानी आहे. कोणासोबत तरी असणे ही केवळ एक सामाजिक मानसिकता असून, स्वतःच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नसल्याचे तिने आवर्जून नमूद केले.

शक्तीच्या मते, जर भविष्यात एखादा योग्य जोडीदार भेटला तर ती लग्नाचा विचार करू शकते, मात्र सध्या तिच्या आयुष्यात कोणीही नाही आणि त्याबद्दल तिला कोणतीही खंत वाटत नाही. आपल्या अटींवर आणि आनंदाने जगणे जास्त महत्त्वाचे असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Mohan (@mohanshakti)

भूतकाळातील कटू अनुभव आणि मातृत्वाबद्दलचे विचार

नात्यांमधील फसवणुकीबद्दल बोलताना शक्तीने तिच्या आयुष्यातील काही धक्कादायक प्रसंग शेअर केले. तिने सांगितले की, एका तीन वर्षांच्या जुन्या नात्यात तिचा विश्वासघात झाला होता, त्यानंतर तिने तत्काळ तो संबंध तोडून टाकला. तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती की अशा चुकांकडे दुर्लक्ष करून नातं टिकवून ठेवावं, मात्र शक्तीने अशा प्रकारच्या वागणुकीचा स्वीकार करण्यास ठाम नकार दिला.

याच चर्चेदरम्यान तिने मातृत्वाबद्दल (Motherhood) आपले मत मांडले. आई होण्याची तिची कधीच इच्छा नव्हती आणि तिच्या मनात तशी भावनाही निर्माण झालेली नाही, असे तिने मोकळेपणाने सांगितले. फसवणूक झाल्यानंतरचा मानसिक त्रास सहन केल्यानंतर, चुकीच्या व्यक्तीला आयुष्यात स्थान देण्यापेक्षा सिंगल राहणे तिने पसंत केले आहे.

News Title: Shakti Mohan Still Single at 40 talk about not to get married 

Join WhatsApp Group

Join Now