“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट

On: May 4, 2024 11:58 AM
Shahrukh Khan Daughter
---Advertisement---

Shahrukh Khan Daughter | बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या सुहाना एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये. त्यामध्ये मी ब्रेकअप केल्याचं कॅप्शन लिहिलं आहे. यामुळे आता सुहाना चर्चेचा विषय ठरू लागली आहे.

सुहानाच्या बॉयफ्रेंडबाबत सांगायचं झालं तर महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य याच्यासोबत सुहाना खान अनेकदा स्पॉट झाली. त्यामुळे सुहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या नातेसंबंधांवरून अनेकदा चर्चा रंगली होती. अशातच आता सुहाना हिने एका जाहिरातीचा फोटो शेअर केला. त्यावर तिच्या बॉयफ्रेंडच्या आईची कमेंट दिसली.

“मी ब्रेकअप केलं..”, सुहाना खानची पोस्ट व्हायरल

जाहिरातीचा एक व्हिडीओ पोस्ट करत तिने पुढे लिहिलं आहे की माझ्याकडे “एक बातमी आहे मी ब्रेकअप केलं..”, “माझ्या साबणासोबत मी ब्रेकअप केलं”, असं तिने आपल्या पोस्टवर कॅप्शन लिहिलं. सुहाना हिने एका शॉवर जेलची जाहिरात केली. व्हिडीओवर अगत्स्यची आई श्वेता बच्चन हिने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

suhana

सुहाना आणि अगत्स्य यांच्या नात्याबाबत चर्चा आहे. दोघेही अनेकदा सोबत स्पॉट झाले होते. मात्र दोघांनी अद्यापही नात्याची घोषणा केली नाही. दोघांनी ‘द अर्चिस’ सिनेमातून चित्रपटामध्ये पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ स्वत: सुहानाने शेअर केलेत.

सुहाना शाहरूखची लेक असल्याने ती नेहमी चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर करताना दिसत आहेत. नुकतीच ती आपल्या वडिलांसोबत एका सिनेमामध्ये दिसणार आहे.

बाप लेक एकाच चित्रपटात

दरम्यान, नुकताच शाहरूख खानचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये शाहरूख आणि सुहाना एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. सुहानाला तिच्या पदार्पणातील ‘द अर्चिस’ सिनेमावरून ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र आता बाबा शाहरूख आपल्या लेकीचं करिअर वाचवण्यासाठी पुढे सरसावला आहे.

News Title – Shahrukh Khan Daughter Suhana Khan Announce About Her Break up

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

धक्कादायक प्रकरणी अमोल कोल्हे पुरावे देणार, आढळराव राजकारणातून बाजूला होणार का?

⁠ऐकावं ते नवलच!, स्वतः वाघेरे करणार श्रीरंग आप्पा बारणेंना मतदान

‘मला काहीही बोला पण…’; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ, अंधारेंमध्ये जुंपली

Join WhatsApp Group

Join Now