मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीत त्यांनी कोणालाच पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती. विधानसभेला मात्र उमेदवार देणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.
मनोज जरांगेंचा गंभीर इशारा
राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल. यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या (Vidhan Sabha) वेळेस नाव घ्यावे लागेल, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.
बीडमधील नारायण गड सभा रद्द झाली कारण तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.
भावनिक होऊ नका- मनो जरांगे
पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही. सर्वांनी विनंती आहे भावनिक होऊ नका, असं आवाहन जरांगेंनी (Manoj Jarange) केलं आहे.
आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्यला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील.मतीमधून आपली ताकद दाखवा, असंही जरांगे (Manoj Jarange) म्हणालेत.
पुन्हा उपोषण करणार- मनोज जरांगे
जरांगे म्हणाले की “प्रत्येक मतदार संघात मोदी सभा घेत आहे. 4 तारखेला पुन्हा उपोषण करणार काही झाले तरी करणार. तिथे पुढची दिशा कळेल. पुढचे उपोषण आमरण उपोषण असणार आहे. सविस्तर प्लॅन 4 तारखेला करूय आम्हाला राजकारणात यायचे नाही पण आरक्षण दिले नाही.. आम्ही सर्व मराठा समाज विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरू. ”
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्या RSS लाही नकली म्हणतील”; उद्धव ठाकरे कडाडले
फुलांच्या माळाने स्वागत केलं नंतर थेट कानाखाली वाजवली; कॉँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल
होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!
‘मोदींवर गुन्हा दाखल करा’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
मलायका अरोराने भाड्याने दिला तिचा फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल






