महिलांशी शारीरिक संबंध आणि नंतर…; जळगावमधील ‘सीरियल किलर’चे हादरवून टाकणारे कारनामे उघड

On: August 1, 2025 12:38 PM
Jalgaon murder
---Advertisement---

Jalgaon murder | जळगावमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह जंगलातच गाडले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी अनिल संदानशिव याला अटक करण्यात आली असून, आता पोलीस तपासामध्ये आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. (Jalgaon murder News)

अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची हत्या :

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची हत्या करणाऱ्या आरोपीचे इतरही अनेक महिलांशी फोनवरून संभाषण झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आरोपीचा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढल्यानंतर त्याने अनेक महिलांशी संभाषण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोपीने आणखी काही महिलांचा खून केला आहे का, हे तपासण्यासाठी आता स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

आरोपी अनिल संदानशिव याने (Anil Sandanshiv) ज्या महिलांसोबत फोनवरून संभाषण केले, त्या महिला जिवंत आहेत का, की त्यांनाही मारण्यात आले आहे, याची माहिती काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके रवाना झाली आहेत. आरोपीचा महिलांशी संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता, याचीही माहिती मिळवण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे.

Jalgaon murder | आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली :

पोलिसांच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. आरोपी अनिल संदानशिव याने आणखी गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  (Jalgaon murder News)

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची दगडानं ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलीस तपासात आरोपी हा विवाहित महिलांना लक्ष्य करायचा असे समोर आले आहे. तो त्यांच्याशी सुरुवातीला गोड बोलायचा, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना जंगलात घेऊन जाऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करायचा. पोलिसांना दोन महिलांचे मृतदेह सापडले असून, या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे.

News Title: Serial Killer’s Shocking Acts Exposed in Jalgaon: Physical Relations with Women Followed by Murder, Police Shaken by CDR Analysis

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now