सुरक्षेबाबत ‘ती’ चूक झाली अन्…, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारची कबुली, धक्कादायक माहिती उघड!

On: April 25, 2025 8:44 AM
Pahalgam Attack update
---Advertisement---

Pahalgam Attack | काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून केंद्र सरकारने या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींची स्पष्ट कबुली दिली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी यासंदर्भात तीन मिनिटांचे महत्त्वाचे विधान करत खळबळजनक माहिती उघड केली. (Pahalgam Attack)

किरेन रिजिजूंची कबुली

पहलगाममध्ये घडलेल्या भ्याड हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं की, तिथं पर्यटकांची ये-जा सुरू असताना, नेहमीच्या दैनंदिन कामांमध्ये काहीही अडथळा नव्हता. मात्र, एका सुरक्षात्मक चुकांमुळे ही गंभीर घटना घडली. दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली.

या बैठकीत गुप्तचर यंत्रणांनी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला घडलेली जागा मुख्य रस्त्यापासून दूर होती. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून प्रवास करावा लागतो. तेथील उंच पठारावर ही घटना घडली. ही जागा दुर्गम असल्यामुळे नियमित सुरक्षा व्यवस्था पोहोचलेली नव्हती. हीच मोठी त्रुटी ठरली आणि त्यामुळे हल्ला घडण्यास वाव मिळाला.

 सर्वपक्षीय बैठकीत खुलासा 

दरम्यान, या बैठकीत गुप्तचर यंत्रणांतील कमी आणि टूर ऑपरेटरकडून वेळेवर माहिती न मिळाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. दरवर्षी अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी या परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच लष्कराची तैनाती केली जाते. मात्र, यावेळी स्थानिक टूर ऑपरेटर आणि नागरिकांनी अधिकृत सूचनेशिवाय परिसर पर्यटनासाठी खुला केला आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज नव्हत्या. ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीची सुरुवात पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत मौन पाळून करण्यात आली. बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, राज्यसभेचे नेते जे पी नड्डा, विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची उपस्थिती होती.

Title : Security Lapse Admitted in Pahalgam Attack

 

Join WhatsApp Group

Join Now