LG Electronics India IPO | गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची मोठी संधी असणार आहे. LG Electronics India Ltd चा IPO लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने एलजीच्या 15,000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी हिरवा कंदील दिला आहे. ह्युंदाईनंतर भारतीय बाजारात IPO आणणारी ही दुसरी मोठी दक्षिण कोरियन कंपनी ठरणार आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया कंपनी
LG Electronics India Ltd ची स्थापना 1997 मध्ये झाली होती. कंपनी फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, टीव्ही आणि मायक्रोवेव्ह या उपकरणांची निर्मिती करते. सध्या भारतात कंपनीची 949 सर्व्हिस सेंटर कार्यरत आहेत.
2024 च्या आर्थिक वर्षात कंपनीने 21,352 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले, जे 2023 च्या तुलनेत वाढ दर्शवते (यापूर्वी 19,868.24 कोटी रुपये होते). तसेच, एलजीला या कालावधीत 1,344 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
IPO व्यवस्थापन आणि गुंतवणूक सल्ला
LG Electronics ने आपल्या IPO साठी मॉर्गन स्टॅन्ले इंडिया, जेपी मॉर्गन इंडिया, एक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज आणि सिटी ग्रुप ग्लोबल इंडिया यांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर, कॅफिन टेक्नोलॉजीला रजिस्ट्रार म्हणून निवडण्यात आले आहे.
टीप: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक जोखमीच्या अधीन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Title : SEBI Approval for LG Electronics India IPO






