Saturn Transit 2025 | शनीदेव (Shani Dev) हिंदू धर्मात न्यायाचे देवता मानले जातात. त्यांचा प्रभाव माणसाच्या कर्मावर आधारित असतो. 29 मार्च 2025 रोजी शनीचे संक्रमण मीन राशीत (Pisces) होणार आहे, ज्यामुळे अनेक राशींवर परिणाम होईल. काही राशींना शुभ फळ मिळतील, तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या 4 राशींनी विशेष काळजी घ्यावी. (Saturn Transit 2025 )
शनीचा मीन राशीत प्रवेश होताच काही राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी कोणतेही निर्णय घेताना सावध राहावे.
मेष (Aries)
शनी मीन राशीत जाताच तुमच्या साडेसातीचा प्रभाव सुरू होईल. त्यामुळे कोणतेही अवैध किंवा चुकीचे काम टाळावे. चुकीच्या संगतीमुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत घाई करू नका आणि पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
उपाय: दररोज हनुमान चालिसाचे पठण करा.
सिंह (Leo)
शनीचे संक्रमण आठव्या भावात राहील, ज्यामुळे मानसिक तणाव आणि अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकतात. संभाषण करताना काळजी घ्या, कारण तुमच्या शब्दांमुळे गैरसमज होऊ शकतो. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.
उपाय: शनिवारी चणे आणि तेलाचे दान करा.
कन्या (Virgo)
वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबतचे छोटे वाद मोठ्या भांडणात रूपांतरित होऊ शकतात. समाजात चुकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणत्याही वादात पडू नका. (Saturn Transit 2025 )
उपाय: शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करा.
धनु (Sagittarius)
शनीचे संक्रमण नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकते. कुटुंबात समन्वयाचा अभाव जाणवेल. प्रेमसंबंध आणि करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. सहकाऱ्यांकडून कामात अडथळे येऊ शकतात.
उपाय: भगवान शंकराची पूजा करा आणि शनिवारी उपवास ठेवा.
Title : Saturn Transit 2025 Big Challenges for These 4 Zodiac Signs






