शनीची वक्री चाल ‘या’ 3 राशींवर मेहरबान; बँक बॅलन्स होईल मजबूत

On: April 9, 2025 1:03 PM
Lucky Zodiac Signs
---Advertisement---

Saturn Retrograde 2025 | शनी वक्री होण्याच्या काळात काही राशींवर धनवर्षा होणार असून करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलणार आहेत. कन्या, मकर आणि मीन या तीन राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. पैशाचा ओघ वाढेल, बँक बॅलन्स मजबूत होईल आणि नवी संधी मिळेल.

कन्या राशीचं नशिब चमकेल

१३ जुलै रोजी सकाळी ९:२६ वाजता शनी मीन राशीत वक्री चाल सुरु करणार असून याचा प्रभाव सर्व राशींवर दिसणार आहे. मात्र कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या सातव्या चरणात शनी वक्री होणार असल्यामुळे व्यवसायात वेगाने प्रगती होईल. आर्थिक स्थैर्य लाभेल, नव्या संधी मिळतील आणि व्यापारात नवीन भागीदारीचे योग तयार होतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार असून कुटुंबीयांशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात एकाग्रता लाभेल.

मकर राशीला करिअरमध्ये नवे दरवाजे उघडणार

मकर राशीसाठी शनीची वक्री चाल फारच अनुकूल आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात शनी उलट दिशेने हालचाल करणार असल्यामुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. बोलण्यात संयम ठेवणे आवश्यक आहे कारण कुठल्याही वादातून संबंध बिघडण्याची शक्यता आहे. पण एकूणच हा काळ सकारात्मक असेल. प्रवासाचे योग आहेत, तसेच भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील.

शनी आता मीन राशीत आहे आणि याच राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत. विशेषतः परदेशात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. विदेशात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. पार्टनरशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. करिअरच्या दृष्टीने उत्तम संधी लाभतील आणि प्रत्येक कामात यश मिळेल.

Title : Saturn Retrograde 2025: Big Gains for These 3 Zodiac Signs

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now