Shani Ast 2026 | ज्योतिष शास्त्रानुसार मार्च 2026 मध्ये शनी ग्रह अस्त होणार असून त्याचा परिणाम काही राशींवर तीव्र जाणवू शकतो. सुमारे 40 दिवसांची ही अवस्था विशेष सावधगिरीची मानली जात आहे. ग्रहस्थितीतील या बदलामुळे चार राशींना आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. (Zodiac signs alert)
शनी अस्ताची वेळ आणि कालावधी :
ज्योतिष अभ्यासकांच्या मते 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 7 वाजून 13 मिनिटांनी शनी अस्त होईल. ही स्थिती जवळपास 40 दिवस कायम राहणार असून 22 एप्रिल 2026 रोजी पहाटे अंदाजे 4 वाजून 49 मिनिटांनी शनीचा पुन्हा उदय होईल. ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असला तरी काही राशींना त्याचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवू शकतो.
शनी हा कर्मफलाचा ग्रह मानला जातो. ग्रह अस्त स्थितीत असताना त्याची ऊर्जा कमी झाल्याचे मानले जाते, ज्यामुळे काही क्षेत्रांत अडथळे आणि अडचणी वाढू शकतात. या काळात विशेषतः चार राशींनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
Shani Ast 2026 | या चार राशींनी घ्यावी काळजी :
मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरी आणि व्यवसायातील परिस्थिती प्रतिकूल होण्याची शक्यता आहे. विश्वासू समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची तसेच कुटुंबात वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. नवीन प्रकल्प किंवा मोठे निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. या काळात पैसे उधार देणे किंवा घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. (Shani Ast 2026)
धनु राशीवर आधीपासूनच शनीच्या ढैय्याचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शनी अस्त काळात वाईट बातम्या मिळण्याची शक्यता, आर्थिक ताण, तसेच नोकरी-व्यवसायात चढउतार अनुभवायला मिळू शकतात. दांपत्य जीवनातही मतभेद वाढू शकतात.
तसेच मीन राशीतच शनी अस्त होणार असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मोठे व्यावसायिक व्यवहार बिघडण्याची शक्यता असून प्रवासामुळे आरोग्याशी संबंधित त्रास उद्भवू शकतो.






