Sajid Khan Pathan Threat | अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) यांना बिश्नोई गँगकडून गंभीर धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांत 10 कोटी रुपये न दिल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला. या घटनेनंतर जिल्ह्यात आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (Sajid Khan Pathan Threat)
अमेरिकेतून धमकीचा कॉल, पोलिसांत तक्रार :
याआधी अकोल्यातील भाजप शहराध्यक्षांना धमकी मिळाल्यानंतर आता अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना लक्ष्य करण्यात आले आहे. शुभम लोणकर (Shubham lonkar) या व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून हा फोन आल्याची माहिती आमदारांनी दिली. कॉलदरम्यान 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि पैसे न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. (Sajid Khan Pathan Threat)
या प्रकरणाची माहिती आमदारांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्जही सादर केला आहे. आतापर्यंत बॉलिवूड कलाकार आणि उद्योजकांना लक्ष्य करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगचे धाडस आता राजकीय क्षेत्रापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. शुभम लोणकरचा वऱ्हाडाशी संबंध असून त्याचे गँगशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. (Lawrence Bishnoi gang)
Sajid Khan Pathan Threat | मुख्यमंत्र्यांचा फोन, सुरक्षेत वाढ :
या घटनेनंतर 16 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साजिद खान पठाण यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांनी परिस्थितीची माहिती घेत सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आमदारांना तातडीने Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली.
दरम्यान, अकोला (Akola) जिल्ह्यातील आणखी एका आमदारालाही धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चंद्रक (Archit Chandak) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला. आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेसाठी चार सशस्त्र पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा केले जात असून कॉलचा स्रोत, शुभम लोणकर आणि त्याच्या भावाचा संभाव्य सहभाग, तसेच राजस्थानसह इतर राज्यांतील बिश्नोई गँगशी संबंधित धागेदोरे तपासले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.






