Sara Ali Khan | अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) गेल्या काही दिवसांपासून तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे (Professional Life) नाही तर खासगी आयुष्यामुळे (Personal Life) चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) देखील साराचे अनेक फोटो (Photos) आणि व्हिडिओ (Videos) तुफान व्हायरल होत असतात. दरम्यान, साराच्या एक्स बॉयफ्रेंडने (Ex-Boyfriend) सारासोबत असलेल्या नात्यावर मोठे वक्तव्य केले आहे. साराचा एक्स बॉयफ्रेंड दुसरा-तिसरा कोणी नसून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा नातू वीर पहाडिया (Veer Pahariya) आहे.
सांगायचे झाले तर, वीर सध्या ‘स्काय फोर्स’ (Sky Force) सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. सिनेमा यशाच्या मार्गावर असताना वीर पहाडिया याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. वीर आणि सारा यांच्या नात्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. 2018 च्या आधी दोघे एकमेकांना डेट (Date) करत होते.
साराने ‘कॉफी विथ करण’मध्ये केला होता खुलासा
वीर याच्यासोबत असलेल्या नात्यावर ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) मध्ये साराने खुलासा केला होता. या एपिसोडमध्ये (Episode) सारा हिच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) देखील होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत (Interview) वीर याने सारासोबत असलेल्या नात्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
वीर पहाडिया काय म्हणाला?
वीर म्हणाला, “एपिसोड प्रदर्शित होत नाही तोपर्यंत मला याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. मला माहिती नव्हते काय शूट झाले आहे. जेव्हा मला कळले मी हैराण झालो. कारण प्लॅटफॉर्म (Platform) मोठा आहे. मी तेव्हा सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) होतो. त्यामुळे कोणी जास्त ओळखू नये, असे मला वाटत होते. पण त्या एपिसोडनंतर लोक मला ओळखू लागली.”
सारा अली खान पुन्हा चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान (Sara Ali Khan) एका भाजप नेत्याच्या (BJP Leader) मुलाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण यावर साराने अधिकृत घोषणा केलेली नाही. सारा हिच्यासोबत दिसणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव अर्जुन प्रताप बाजवा (Arjun Pratap Bajwa) असल्याची चर्चा आहे.
थोडक्यात, सारा अली खानचा एक्स बॉयफ्रेंड वीर पहाडिया याने त्यांच्या नात्याबद्दल मौन सोडले असून, ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडनंतर त्याला लोक ओळखू लागल्याचे त्याने सांगितले.
Title : Sara Ali Khan Ex Boyfriend Veer Pahariya Opens Up About Their Relationship






