Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी सुदर्शन घुले याचा जबाब समोर आला असून, त्यामध्ये त्याने अपहरण, मारहाण आणि खंडणीविषयी अनेक गंभीर गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. (Santosh Deshmukh Murder)
संतोष देशमुख यांचे अपहरण कसे झाले?
8 ऑक्टोबर 2024 रोजी बीड (Beed) येथील जगमित्र कार्यालयात झालेल्या एका मिटिंगमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि आवादा कंपनीचे मॅनेजर थोपटे एकत्र आले होते. त्या वेळी दोन कोटी रुपयांची मागणी करत, जर पैसे दिले नाहीत तर जिल्ह्यात कोणताही प्लांट चालू देणार नाही अशी धमकी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने दिल्याचे समोर आले आहे.
सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने दिलेल्या जबाबानुसार, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे अपहरण करण्यासाठी दोन गाड्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील एक स्विफ्ट कार ही भाड्याने आणलेली होती. बीडमधील टोलनाक्यावर एक गाडी समोर आणि दुसरी मागे ठेवून देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण करताना त्यांना वायर, पाईप आणि लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. क्लच वायरने देखील त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सुदर्शनने आपल्या जबाबात मान्य केले आहे.
खंडणीसाठी दबाव आणि कंपनीत हल्ला
29 नोव्हेंबर 2024 रोजी विष्णू चाटे (Vishnu Chate) याने दोन वेळा फोन करून, दुर्गा पूजेच्या वेळी झालेल्या चर्चेनुसार प्लांट बंद करण्याचा इशारा दिला होता. शिंदे नावाचे मॅनेजर सहकार्य करत नसल्यामुळे वाल्मिक कराड यांनी सुदर्शन घुलेला आदेश दिला की, कंपनीत जाऊन त्यांच्या भाषेत समजावून सांग. त्या आदेशानुसार सुदर्शन एक वाजता आवादा कंपनीत (Abada Company) पोहोचला आणि धमकी दिली.
पुढे 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी पुन्हा विष्णू चाटेने फोन करून काम बंद न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले यांनी कंपनीत धडक दिली. त्यावेळी वॉचमनला मारहाण करण्यात आली आणि बाहेर दोन लोक ठेवून इतर कोणालाही आत येऊ दिलं नाही. याच वेळी सरपंच संतोष देशमुख तिथे पोहोचले आणि वाद झाला. सुदर्शन घुलेच्या जबाबानुसार, या वादातूनच पुढे हत्या आणि खंडणी या दोन्ही प्रकरणांचा संबंध उघड झाला आहे.
Title : Santosh Deshmukh Murder Swift Car connection






