संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, रत्नागिरीहून आलेल्या महिलेचा कृष्णा आंधळेबाबत धक्कादायक दावा!

On: April 21, 2025 9:12 PM
Santosh Deshmukh Murder Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder Case | बीडमधील मस्साजोग गावातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्याप्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत (Krishna Aandhale)आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रत्नागिरीहून आलेल्या एका अनोळखी महिलेने देशमुखांच्या घरासमोर ठाण मांडून, कृष्णा आंधळे सध्या तिच्यासोबत असल्याचा तसेच तिच्याकडे त्याच्याविषयी महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

महिलेचा धक्कादायक दावा-

शनिवारी सायंकाळी 6 वाजता ही अज्ञात महिला मस्साजोग येथील देशमुखांच्या घरासमोरील मंडपात येऊन थांबली. तिने पोलीसांना फरार असलेल्या कृष्णा आंधळेबाबत माहिती असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली. तिच्या मते, कृष्णा आंधळे तिच्यासोबत राहतो आणि तिने काही पुरावेही गोळा केले आहेत. परंतु पोलिसांनी तिला नाव विचारले असताना, तिने कोणतीही ओळख सांगण्यास नकार दिला.

रात्रभर त्या पॅन्डॉलमध्ये राहिल्यानंतर, सकाळी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला. तिच्यासाठी इतर बाथरूमची सोय करून देण्यात आली, तरीदेखील ती देशमुखांच्या घरातच अंघोळ करणार, असा आग्रह धरत होती. त्यामुळे घरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

महिलेची ओळख अद्याप गूढच

या घटनेनंतर केज पोलीस ठाण्यातून एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. नंतर ती महिला बसमध्ये बसून पुन्हा रत्नागिरीकडे रवाना झाली. या महिलेबाबत अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये दिसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. आता रत्नागिरीहून आलेल्या या महिलेच्या दाव्यानंतर तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू झाला आहे. पोलिस महिलेने केलेल्या दाव्यानंतर अधिकची चौकशी करत आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)

देशमुख कुटुंबीयांची प्रतिक्रिया 

धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “महिलेकडे पुरावे असल्याचं आम्हाला कळालं, म्हणून आम्ही पोलिस आणि गावकऱ्यांना माहिती दिली. रत्नागिरी पोलिसांनाही याबाबत सूचित केलं होतं. त्यांनीही अशा तक्रारी दाखल झाल्याची माहिती दिली, पण आम्ही शहानिशा करत आहोत. ही महिला सकाळी अंघोळीसाठी आग्रह करत होती, त्यामुळे संशय निर्माण झाला.”

Title : Santosh Deshmukh Murder Case Woman Claims Proof Against Krishna Aandhale

 

Join WhatsApp Group

Join Now