देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचं!, विशेष मकोका न्यायालयाचं थेट निरीक्षण

On: July 30, 2025 1:09 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) विशेष मकोका न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कराडने दोषमुक्ततेसाठी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला असून, न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, कराडच या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज (Discharge) मिळणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

वाल्मिक कराडवर गंभीर आरोप – गुन्हेगारी इतिहास उघड :

न्यायालयाच्या निरीक्षणात म्हटलं आहे की, वाल्मिक कराड (Walmik Karad) हा एक सक्त टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, गेल्या दहा वर्षांमध्ये त्याच्यावर सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केवळ इतकंच नाही, तर संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून केवळ खंडणीच्या अडथळ्यामुळे रचला गेला, हे पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.

कराडविरोधातील केस केवळ तोंडी साक्षांवर नाही तर डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक माहिती आणि महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित आहे. न्यायालयाने हेही नमूद केलं की, कराडने प्रकल्प चालकांना धमक्या दिल्या असून, तो गोपनीय पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतोय.

Walmik Karad | जामीनही फेटाळला :

या प्रकरणात कराडला यापूर्वीही जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो जामीन अर्जही सबळ पुराव्यांमुळे फेटाळला होता. त्यामुळे कराडची अडचण आणखी गंभीर झाली असून त्याच्या विरोधातील पोलिस आणि न्यायालयीन हालचाली आता अधिक गती घेण्याची शक्यता आहे.

विशेष मकोका न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे की, “संतोष देशमुख (Santosh deshmukh) खून कटात कराडने प्रमुख भूमिका बजावली असून, हा गुन्हा त्याच्या सांगण्यानुसार आणि नेतृत्वाखालीच घडवण्यात आला आहे.” त्यामुळे त्याला दोषमुक्त करण्याचा प्रश्नच येत नाही.

News Title: Santosh Deshmukh Murder Case: MCOCA Court Rejects Walmik Karad’s Discharge Plea – Calls Him Key Conspirator

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now