IPL 2026 Points Table | आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्स संघाने दमदार कामगिरी करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. 3 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने Chennai Super Kings संघाचा पराभव करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. कर्णधार Shreyas Iyer यांच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने या मोसमाची सुरुवातच जोरदार केली असून संघ सध्या अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
या विजयामुळे गुणतालिकेत मोठे बदल झाले. पंजाब पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून Rajasthan Royals संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे चेन्नईला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांची गुणतालिकेत तळाशी घसरण झाली आहे.
पंजाबची दमदार धाव, चेन्नईची घसरण :
पंजाब किंग्सने या आधीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवत त्यांनी सलग दुसरी बाजी मारली. चेन्नईने दिलेले 210 धावांचे मोठे लक्ष्य पंजाबने 8 चेंडू राखून पूर्ण केले. (IPL 2026 Points Table)
या विजयामुळे पंजाबच्या खात्यात 2 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण झाले असून संघाचा नेट रनरेट 0.673 इतका झाला आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सला सलग दोन पराभवांचा धक्का बसला असून त्यांचा नेट रनरेट -2.562 इतका घसरला आहे.
IPL 2026 Points Table | गुणतालिकेत मोठे बदल :
या सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानी घसरले, तर Royal Challengers Bengaluru संघ तिसऱ्या स्थानी आहे. पंजाबच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानी पोहोचले असून Mumbai Indians पाचव्या क्रमांकावर गेले आहेत.
सध्या राजस्थान, आरसीबी, दिल्ली आणि मुंबई या चार संघांच्या खात्यात प्रत्येकी 2 गुण आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ससह गुजरात टायटन्स, Lucknow Super Giants आणि Kolkata Knight Riders हे संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.
आज डबल हेडरचा थरार :
दरम्यान, 4 एप्रिल रोजी आयपीएलमध्ये पहिला डबल हेडर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात Delhi Capitals आणि Mumbai Indians हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना अरुण जेटली स्टेडियम येथे होणार आहे.
तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात राजस्थानला विजय मिळवून पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याची संधी असेल.






