Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासात CIDने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या मोबाइल फोनच्या तपासातून अनेक खुलासे समोर आलेत.
हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल
CID च्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या दिवशी आरोपींपैकी एकाने महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेत्याला 16 कॉल केले होते. ही माहिती आरोपींच्या मोबाइल फोनच्या कॉल रेकॉर्ड्सच्या तपासातून मिळाली आहे. या कॉल्सचा अर्थ काय होता आणि त्यामागील उद्देश काय होता, याची पूर्णपणे चौकशी करण्यात येत आहे.
Santosh Deshmukh Case | आरोपींच्या मोबाइलमध्ये मारहाणीची व्हिडिओ
CID ने आरोपींच्या मोबाइल फोनमधून संतोष देशमुख यांच्या मारहाणीची व्हिडीओ हस्तगत केली आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ आरोपींनी स्वतःच तयार केले होते आणि ते त्यांच्या मोबाइल फोनमध्ये साठवून ठेवले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या परिवाराला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकाच्या ट्रान्सफरसह, या प्रकरणातील ढिलाईबद्दल जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट!
होमिओपॅथी डॉक्टरांसाठी खूशखबर, अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासंदर्भात मोठा निर्णय
काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?
वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!
सतीश वाघ हत्या प्रकरणाला नवं वळण, पत्नी मोहिनीचे पतीबद्दल धक्कादायक खुलासे






