राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपचा दरवाजा ठोकून थकला, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा; या बड्या नेत्याची पवारांकडे मागणी

On: May 4, 2024 12:40 PM
Maharashtra Politics
---Advertisement---

Sharad Pawar l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावच्या भुसावळ येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरपूस शब्दांत टीका केल्यानं ही सभा चर्चचा मुद्दाच बनली आहे. अशातच या सभेदरम्यान माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवारांकडे एक मोठी मागणी केली आहे.

Sharad Pawar l साहेब एकनाथ खडसे यांची हकालपट्टी करून टाका :

भुसावळ येथील सभेत माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकनाथ खडसे यांची हकालपट्टी करून टाका अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. “एकनाथ खडसे हे दरवाजा ठोकून ठोकून थकले. मात्र भाजप त्यांना काय घेत नाही. साहेब, आपली आमदारकी त्यांच्यामुळे वाया गेली आहे.

एकनाथ खडसेंची दिल्लीला जायला तब्येत खराब नसते आणि मीटिंग घ्यायला तब्येत खराब असते. तसेच सुनेला तिकीट मिळाल्यानंतर कशी त्यांची तब्येत खराब होत नाही?” अशी टीका माजी आमदार संतोष चौधरी यांनी केली आहे. तसेच एकनाथ खडसे ज्या ज्या ठिकाणी फिरताहेत त्या ठिकाणी त्यांच्या सोबत 100 लोक सुद्धा फिरत नाही.

पवार साहेब तुम्ही अशा लोकांपासून यापुढे सावध राहा – संतोष चौधरी

एकनाथ खडसे यांना भाजप पक्षाने व्यासपीठावर यायला सांगितले आहे. तसेच फक्त चोरून चोरून सभा घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा विषय संपवून टाका. तसेच ते स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार नाहीत. माझ्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता असला तर आमदारकीचा राजीनामा देखील देऊन टाकला असता. मात्र थोडीफार पण त्यांना लाज वाटत नाही असा घणाघाती हल्ला संतोष चौधरी यांनी केला आहे.

याशिवाय पवार साहेब तुम्ही अशा लोकांपासून यापुढे सावध राहा. ज्या लोकांनी तुमच्यासोबत म्हणजेच शरद पवार साहेबांसोबत गद्दारी केली आहे त्या लोकांचा बदला आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा शब्दांत माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवार यांच्यासमोर भाषणातून एकनाथ खडसे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

News Title – santosh chaudhari request to sharad pawar to remove eknath khadse

महत्त्वाच्या बातम्या –

नागरिकांनो…घराबाहेर पडू नका; या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

“मी ब्रेकअप केलंय”, शाहरूखच्या लेकीची पोस्ट व्हायरल; बॉयफ्रेंडच्या आईने केली कमेंट

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ‘इतक्या’ जागांवर विजय मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now