राजकारणात मोठी उलथापालथ होणार? संजय राऊतांच्या ट्वीटमुळे राजकीय खळबळ

On: November 22, 2025 4:12 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवे समीकरण घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आणि पक्षांमध्ये असणारे मतभेद आता अधिकच गहिरे होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः मनसेसोबतचा मुद्दा आता नव्या वादाला सुरूवात करतोय. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut Tweet) यांच्या एका ट्वीटने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.

मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनीती आखत आहेत. सत्ताधारी महायुतीचे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्र येणार आणि कोण वेगळे जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसने मनसेसोबत असल्यास आम्ही आघाडीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.

संजय राऊतांचे ट्वीट नेमकं काय सांगतं? :

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवस राजकीय कार्यक्रमांपासून दूर होते, मात्र राजकीय घडामोडींवर त्यांची बारीक नजर होती. काँग्रेसकडून मनसेविरोधी भूमिका समोर आल्यावर त्यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीमध्ये मनसेलाही स्थान देण्यात येईल, असा स्पष्ट संकेत दिला आहे.

“लोकांची इच्छा आणि परिस्थितीचा विचार करून शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आली आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. तसेच हा निर्णय दिल्लीवर अवलंबून नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर आधारित असल्याचेही त्यांनी सुचवले.

Sanjay Raut | काँग्रेस बदलणार का भूमिका? :

राऊत यांनी काँग्रेसला थेटपणे संदेश देत म्हटले आहे की महाराष्ट्रातील सर्व प्रगतिशील शक्तींनी एकत्र येऊन मुंबई वाचवणे गरजेचे आहे. त्याचवेळी शरद पवारांनी मात्र मनसेसोबत जाण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळातून संकेत मिळत आहेत.

आता या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आपला निर्णय बदलणार का? की महाविकास आघाडी मनसेसोबत जाण्यामुळे अंतिमतः फाटणार? हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात सर्वात चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, आगामी काही दिवसांत मुंबई महापालिका निवडणुकीतील (BMC Election) राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. कारण संजय राऊतांच्या या ट्वीटने महाविकास आघाडीतील तणाव आणि स्वार्थाच्या राजकारणाला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

News Title: Sanjay Raut’s Tweet Sparks Political Turmoil: Will MVA Accept MNS Before BMC Elections?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now