“..तर 2019 मध्येच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”; बड्या नेत्याच्या खुलाश्यामुळे खळबळ

On: May 14, 2024 5:04 PM
Santosh Bangar
---Advertisement---

Eknath Shinde | 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत असलेली वर्षांची युती तोडली आणि राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आघाडी केली. यावेळी मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे विराजमान झाले. मात्र, हे सरकार पाच वर्षही पूर्ण करू शकलं नाही. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत बंड करत महाविकास आघाडी सरकार पाडलं. सध्या राज्यात तीन चाकी सरकार म्हणजेच शिंदे,फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार सत्तेत आहे.

अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा 2019 च्या निवडणुकीचा मुद्दा समोर आणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सरकार स्थापन केलं. सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री असून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, या बंडखोरीपूर्वीच म्हणजेच 2019 मध्येच शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असं राऊत म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde )हे 2019 मध्येच मुखमंत्री असते. 2019 मध्ये भाजपने दिलेला शब्द पाळला नाही.   गुजरातच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये खेळ खंडोबा केलाय. “, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही तुरुंगात गेलो, आजारी पडलो आज माझा डावा हात चालत नाही पण आम्ही भांडवल केलं नाही, असंही राऊत यांनी म्हटलं.

” ज्या पक्षाने सर्वस्व दिलं त्यासाठी मी लढत राहणार, मी पलायन करणार नाही, मी लढायला आणि मरायला तयार आहे. मी भाजपसोबत कधी जाणार नाही.”, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधत हल्लाबोल केला.

“मोदी आणि शहा यांनी ठरवलं तर.. “

“देशात मोदी आणि शहा यांनी जर ठरवलं तर ते कुणालाही तुरुंगात टाकू शकतात. मात्र, सत्ता कायम नसते. तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी आणि शहा खोटारडे असून त्यांनी देशाला तेच धडे दिले.”, असं संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

पुढे त्यांनी शिंदे-फडणवीस यांनाही टार्गेट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार आहे. शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही, असा दावाच संजय राऊत यांनी केलाय.

News Title : Sanjay Raut target cm eknath shinde

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा

मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा

अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं

‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले

‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण

Join WhatsApp Group

Join Now