मोदी-शहांची तळी राज ठाकरे उचलतायेत; ‘या’ नेत्याची टीका

On: November 5, 2024 12:27 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना ही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही. तर धनुष्यबाण आणि शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचच अपत्य आहे असे म्हणत राजकारणावर टीकास्त्र सोडलं होत. मात्र यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मोदी-शाह यांची तळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उचलतात :

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील पहिल्या सभेत सर्वांवरच जोरदार हल्ला चढवला होता. मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर घणाघाती हल्ला केला आहे. शिवसैनिक, शिवसेना, हिंदुहृदयसम्राट ही बाळासाहेब ठाकरेंची जी प्रॉपर्टी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह यांची तळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उचलत आहेत.

राज ठाकरे यांचा हल्ला हा मोदी-शहांवर पाहिजे. तसेच त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, तर सभागृहात पाहून त्यांनी बोलावं. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची कसलीही गरज नाही. ज्या मोदी व शहांनी बेकायदेशीरपणे शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली, त्याच भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात व्हावा यासाठी तुमचे प्रयत्न देखील आहेत. मात्र त्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना कधीच माफ करणार नाहीत असा घणाघाती हल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे.

Raj Thackeray l खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र :

याशिवाय आम्ही काय वेगळं सांगत होतो का ? ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची आहे. मात्र राष्ट्रवादी हे शरद पवारांचंच अपत्य आहे. तसेच त्यांच्या हयातीत तो पक्ष अजित पवारांना देणारा निवडणूक आयोग कोण आहे? तसेच जनता, शिवसेना, शिवसैनिक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण आहेत? हाच आमचा सवाल आहे. तसेच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे उचलत आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

News Title :  Sanjay Raut slams Raj thackrey

महत्वाच्या बातम्या –

सलमान खानचं टेन्शन वाढलं; जिवंत रहायचं असेल तर…

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..

फडणवीसांनी ईडीचा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव आणि भाव कोसळला!

बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now