Jaykumar Gore l ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावर टीका करत जयकुमार गोरे यांना “ज्युनियर किरीट सोमय्या” असे संबोधले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
जयकुमार गोरे हक्कभंग प्रस्ताव आणणार, संजय राऊतांचा पलटवार :
जयकुमार गोरे यांनी संजय राऊत, आमदार रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “ते हक्कभंग कोणावर आणणार आहेत? त्या महिलेसाठी जी त्यांच्याविरोधात तक्रार करत आहे? कोर्टाने निर्दोष ठरवलं असलं तरी आमच्याकडेही पुरावे आहेत.”
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली. “तुम्ही अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात घेऊन महाराष्ट्राची कोणती संस्कृती देशाला दाखवत आहात?” असा सवाल त्यांनी केला आहे.
Jaykumar Gore l महिलेची आत्महत्येची धमकी, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा :
संजय राऊत यांनी दावा केला की, पीडित महिलेला जयकुमार गोरे सतत त्रास देत आहेत आणि तिने आत्महत्येची धमकी दिली आहे. “ती महिला विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तत्काळ जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
मात्र आता या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून, जयकुमार गोरे यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








