मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊत म्हणाले “तात्या विंचू रात्री येऊन…”

On: October 21, 2025 1:38 PM
Mahesh Kothare
---Advertisement---

Mahesh Kothare | दिग्दर्शक, अभिनेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव असलेले महेश कोठारे (Mahesh Kothare) सध्या चर्चेत आले आहेत. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक विधान केलं. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

“तुम्ही कलाकार आहात”

या विधानानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महेश कोठारे यांच्यावर टीका केली. राऊत यांनी म्हटलं की, “तुम्ही कलाकार आहात. तुमचे चित्रपट फक्त भाजपाचे (BJP) कार्यकर्ते पाहतात असं नाही. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांचे आणि सर्व स्तरातील लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही फक्त भाजपाचे नव्हे, तर महाराष्ट्राचे आहात.” राऊत यांनी या वक्तव्यानंतर विनोदी अंदाजात एक टोला देखील लगावला. ते म्हणाले, “तात्या विंचू रात्री येऊन तुझा गळा दाबेल!”

या कार्यक्रमादरम्यान कोठारे (Mahesh Kothare) म्हणाले, “मी भाजपाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) भक्त आहे. मला विश्वास आहे की लवकरच मुंबईला भाजपचा महापौर मिळेल.” त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, मात्र सोशल मीडियावर यावरून चांगलाच वाद पेटला.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

राऊत यांचे हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून अनेकांनी या संवादाचा संदर्भ ‘झपाटलेला’ या चित्रपटातील प्रसिद्ध पात्राशी (Mahesh Kothare) जोडला आहे. दरम्यान, काहींनी कोठारे यांच्या स्पष्ट भूमिकेचं स्वागत केलं असून “प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे” असंही म्हटलं आहे. तर काहींनी कलाकारांनी राजकारणात मतप्रदर्शन करताना संतुलन राखावं असा सल्ला दिला आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक नवा राजकीय रंग चढला आहे. महेश कोठारे यांच्या एका वक्तव्याने निर्माण झालेला हा वाद सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

News Title:- Sanjay Raut slams Mahesh Kothare

Join WhatsApp Group

Join Now