Sanjay Raut | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक शैलीत भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. पक्ष फोडण्यासाठी भाजपने नेमलेले दलाल यामध्ये गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला. “गिरीश महाजन हे महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असून त्यांची भाषा आणि वर्तनच भाजपला बुडवणार आहे,” असा घणाघात राऊतांनी केला.
“दलालांचं राज्य सुरू आहे” :
राऊतांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजप आता ठेकेदार, दलाल आणि भ्रष्ट लोकांच्या हाती गेला आहे. एकेकाळी पवित्र लोकांचा पक्ष असलेला भाजप, आता पक्ष फोडणाऱ्या आणि खंडणीखोरांची जमात झाली आहे. “गिरीश महाजन हे त्या जमातीतीलच प्रमुख दलाल आहेत,” असे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी महाजन यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करत, ‘सत्ता नसताना ते पक्ष बदलायला तयार होते’ असा मोठा गौप्यस्फोटही केला. (Sanjay Raut Slams Girish Mahajan as BJP’s Agent)
“पक्ष बदलणारे पहिलेच गिरीश महाजन ठरतील. जेव्हा मविआ सरकार होतं तेव्हा ते राजकारणातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यावेळी ते स्वतः निरोप पाठवत होते की मी शांत बसतो,” असा खुलासा करत राऊतांनी महाजन यांना ‘डरपोक’ अशी उपाधी दिली.
Sanjay Raut | “शिवसेना संपणार नाही, 10 पिढ्या लागो त्या” :
शिवसेना संपवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवरही राऊतांनी टीका केली. “शिवसेना संपवण्याचे बोलणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणं. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण विसरू नका. तुमच्या 10 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला. महाजन यांची बोलकी शैलीच भाजपला अडचणीत आणेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. (Sanjay Raut Slams Girish Mahajan as BJP’s Agent)
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर विचारले असता राऊत म्हणाले, “सुनील प्रभू आमचेच आमदार आहेत. काही चर्चा सुरू असतील, तरी त्या समोर का याव्यात? योग्य वेळ येईल, तेव्हा सांगेन.”






