“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

On: May 11, 2024 11:45 AM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज पुण्यात महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरेंनी भाषण देखील केलं. यावरून शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे.

“बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

राज ठाकरे पुण्यातील जाहीर सभेत म्हणाले होते की,मशीदमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचे फतवे काढले जाणार असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की, त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मत द्यावी, यावर संजय राऊत म्हणाले की, काढा फतवा काढा. ते आता फतव्याकडे वळले आहेत. काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी, अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही, असंही राऊत म्हणालेत.

महाराष्ट्रासह देशात संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरु आहे. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना या देशातील सर्व जाती धर्माचे लोक संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरु इच्छित आहेत. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत, असंही राऊत म्हणाले.

काय म्हणाले Raj Thackeray?

मी आजची सभा का घेतोय? मुरलीधरजी आज पुण्यासारख्या मोठ्या शहरात, ज्या शहराने इतके विद्वान दिले, अशा एका पुणे शहरात तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या खासदाराची उमेदवारी मिळाली आहे म्हणून मी आलेलो आहे. आपण विमानतळ आणि ट्रेनमध्ये सोडायला जातो तेव्हा बाहेरचं काही खाऊ नको, असे सल्ले देतो. आपल्या नियोजनशून्य गोष्टींमुळे शहरं डोळ्यांदेखत बरबाद होत आहेत, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करा. जर मस्जिदमधून मौला असे फतवे काढत असतील तर आज राज ठाकरे फतवा काढत आहे. भापजचे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

माझे मोदी सरकारबद्दल मतभेद राहणार! पण तरीदेखील महायुतीला मतदान करा; राज ठाकरे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now